Swami Samarth Aarti

Swami Samarth Aarti

जय देव जय देव जय जय स्वामी समर्था | 
आरती ओवाळू चरणी ठेवुनिया माथा || धृ || 

छेली खेडीग्रामी तू अवतरलासी | 
जगदुद्धारासाठी राया तू फिरसी | 
भक्तवत्सल खरा तू एक होसी | 
म्हणुनी शरण आलो तुझे चरणासी || १ || 

त्रैगुण्य परब्रह्म तुझा अवतार | 
त्याची काय वर्णू लीला पामर | 
शेषादिक शिणले नलगे त्या पार | 
तेथे जडमूढ़ कसा करू मी विस्तार || २ || 

Comments