Arti Tukaram - Shri Tukaram Maharaj Arti

Arti Tukaram - Shri Tukaram Maharaj Arti

आरती तुकाराम ।
स्वामी सद्गुरु धाम ।।
सच्चिदानंद मूर्ती ।
पाय दाखवी आम्हा ।।ध्रु.।।

राघवे सागरात ।
पाषाण तारीले ।।
तैसे हें तुकोबाचे ।
अभंग उदकी रक्षिले ।।१।।
आरती तुकाराम ।।

तुकिता तुलनेसी ।
ब्रह्म तुकासी आले ।।
म्हणोनि रामेश्वरे ।
चरणी मस्तक ठेविले ।।२।।

आरती तुकाराम ।
स्वामी सद्गुरु धाम ।।
सच्चिदानंद मूर्ती ।
पाय दाखवी आम्हा ।।

Comments