Aarti Sai Baba - Shri Saibaba Aarti

Shri Sai Baba was famous saint in Shirdi, Maharashtra. He has devotees all over the world.

Aarti Sai Baba - Shri Saibaba Aarti


आरती साईबाबा । 
सौख्यदातार जीवा , चरणरजतळी  ।
  द्यावा दासा विसावा, भक्ता विसावा ।।धृ.।। आरती साईबाबा ।

जाळुनिया अनंग, स्वस्वरुपी राहे दंग ।
मुमुक्षु जना दावी, निज डोळा श्रीरंग ।।१।। आरती साईबाबा । 

जया मनी जैसा भाव, तया तैसा अनुभव ।
दाविसी दयाघना, ऐसी तुझी ही माव ।।२।। आरती साईबाबा ।  

तुमचे नाम ध्याता, हरे संसृतिव्यथा ।
अगाध तव करणी, मार्ग दाविसी अनाथा ।।३।। आरती साईबाबा ।  

कलियुगी अवतार, सगुणब्रह्म साचार ।
अवतीर्ण झालासे, स्वामी दत्त दिगंबर ।।४।। आरती साईबाबा ।  

आठा दिवसा गुरुवारी, भक्त करिती वारी ।
प्रभुपद पहावया, भवभय निवारी ।।५।। आरती साईबाबा ।  

माझा निज द्रव्य ठेवा, तव चरण रजसेवा ।
मागणे हेचि आता, तुम्हा देवाधिदेवा ।।।६।। आरती साईबाबा ।  

इच्छित दीन चातक, निर्मल तोय निजसुख ।
पाजावे माधवा या, सांभाळ आपुली भाक ।।७।। आरती साईबाबा । 

Comments