Yei Ho Vitthale Maze Mauli Ye

Yei Ho Vitthale Maze Mauli Ye

येई हो विठ्ठले माझे माउली ये ।
येई हो विठ्ठले माझे माउली ये ।
   निढळावरी कर, निढळावरी कर ।
ठेउनी वाट मी पाहे, देवा वाट मी पाहे ।।धृ ।।

आलिया गेलिया हाती धाडी निरोप ।
आलिया गेलिया हाती धाडी निरोप ।
पंढरपूरी आहे, पंढरपूरी आहे ।
माझा मायबाप, माझा मायबाप ।।
येई हो विठ्ठले माझे माउली ये ।।१।।

पिवळा पीतांबर कैसा गगनी झळकला ।
पिवळा पीतांबर कैसा गगनी झळकला ।
गरुडावर बैसोनी, गरुडावर बैसोनी ।
माझा कैवारी आला, माझा कैवारी आला ।।२।।
येई हो विठ्ठले माझे माउली ये ।।

विठोबाचे राज्य आम्हा नित्य दिपवाळी ।
विठोबाचे राज्य आम्हा नित्य दिपवाळी ।  
विष्णूदास नामा, विष्णूदास नामा | 
जीवे भावे ओवाळी, जीवे भावे ओवाळी ।।३।।
येई हो विठ्ठले माझे माउली ये ।।

Comments