Arti Dnyanaraja - Dnyaneshwar Maharaj Arti

Arti Dnyanaraja - Dnyaneshwar Maharaj Arti

आरती ज्ञानराजा ।
  महाकैवल्यतेजा ।।
सेविती साधुसंत ।
मनु वेधला माझा ।।ध्रु.।।

लोपले ज्ञान जगी ।
हित नेणती कोणी ।।
अवतार पांडुरंग ।
नाम ठेविले ज्ञानी ।।१।।
आरती ज्ञानराजा ।।

कनकाचे ताट करी ।
उभ्या गोपिका नारी ।।
नारद तुंबर हो ।
साम गायन करी ।।२।।
आरती ज्ञानराजा ।।

प्रगट गुह्य बोले ।
विश्व ब्रह्मची केले ।।
रामा जनार्दनीं ।
पायी मस्तकचि ठेले ।।३।।

आरती ज्ञानराजा।
महाकैवल्यतेजा ।।
सेविती साधुसंत ।
मनु वेधला माझा ।।

Comments