Shri Maruti Stotra

Shri Maruti Stotra, is one of the very powerful prayers of LORD Hanuman. LORD Hanuman is a god of Power. Chanting/reciting/reading this stotra once a day, gives human beings a moral to fight with all his difficulties and helps to win against them.

Shri Maruti Stotra was written by the famous saint Shri. Samarth Ramdas Swami, who was a popular saint in Maharashtra, INDIA and the Devotee of LORD RAMA.

Following is the Shri Maruti Stotra

Shri Maruti Stotra

Shri Maruti Stotra - श्री मारुती स्तोत्

भीमरूपी महारुद्रा, वज्र हनुमान मारुती।।
वनारी अंजनी सूता, रामदूता प्रभंजना ।।१।।

महाबळी प्राणदाता, सकळा उठवी बळे ।।
सौख्यकारी दु:खहारी, दूत वैष्णवा गायका ।।२।।

दीननाथा हरीरूपा, सुंदरा जगदंतरा ।।
पातालदेवता हन्ता, भव्यसिंदूरलेपना ।।३।।

लोकनाथा जगन्नाथा, प्राणनाथा पुरातना ।।
पुण्यवंता पुण्यशीला, पावना परितोषका ।।४।।

ध्वजांगे उचली बाहो, आवेशे लोटला पुढे ।।
काळाग्नि काळरुद्राग्नि, देखता कापती भये ।।५।।

ब्रम्हांडे माइली नेणो, आवळे दंतपंगती ।।
नेत्राग्नी चालिल्या ज्वाला, भृकुटी ताठिल्या बळे ।।६।।

पुच्छ ते मुरडिले माथा, किरीटी कुंडले बरी ।।
सुवर्णकटीकासोटी, घंटाकिंकिणीनागरा ।।७।।

ठकारे पर्वता ऐसा, नेटका सडपाताळू ।।
चपळांग पाहता मोठे, महाविद्युल्लतेपरि ।।८।।

कोटीच्या कोटी उड्डाणे, झेपावे उत्तरेकडे ।।
मंदाद्रीसारिखा द्रोणू, क्रोधे उत्पाटिला बळे ।।९।।

आणिला मागुती नेला, आला गेला मनोगती ।।
मनासी टाकिले मागे, गतीसी तुळणा नसे ।।१०।।

अणूपासोनी ब्रम्हाण्डा, एवढा होत जातसे ।।
तयासी तुळणा कोठे, मेरुमांदार धाकुटे ।।११।।

ब्रम्हाण्डाभोवते वेढे, वज्रपुच्छे करू शके ।।
तयासी तुळणा कैची, ब्रम्हाण्डी पाहता नसे ।।१२।।

आरक्त देखिले डोळा, ग्रासिले सुर्यमंडळा ।।
वाढता वाढता वाढे, भेदिले शून्य मंडळा ।।१३।।

धनधान्यपशुवृद्धी, पुत्रपौत्र समग्रही ।।
पावती रूपविद्यादि, स्तोत्रपाठे करोनिया ।।१४।।

भूतप्रेतसमन्धादी, रोगव्याधि समस्तहि ।।
नासती तूटती चिंता, आनंदे भीमदर्शने ।।१५।।

हे धरा पंधराश्लोकी, लाभली शोभली बरी ।।
दृढदेहो निसंदेहो, संख्या चंद्रकळागुणे ।।१६।।

रामदासी अग्रगण्यू, कपिकुळासि मंडणू ।।
रामरूपी अंतरात्मा, दर्शने दोष नासती ।।१७।।

इति श्री रामदासकृतं संकटनिरसनं मारुतीस्तोत्रं संपूर्णं ।।

Comments